गुरुगोविंद सोसायटी चेअरमनपदी शालिग्राम मालकर यांची बिनविरोध निवड

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील गुरुगोविंद विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शालिग्राम मालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमनपदी हाजी अनिस खाटीक यांची निवड करण्यात आली.

 

आज शुक्रवार दि. २७ मे रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमनसह सर्व कार्यकारिणी यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी विजय सावळे, राजधर मालकर, राजेंद्र गीते, जयप्रकाश जैन, विजयसिंग नाईक, ज्योतीलाल चव्हाण, बालू बडगुजर, सुनील क्षीरसागर, जयश्री बडगुजर, भीमाबाई पाटील, सुरेश भडांगे हे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. याप्रसंगी सुखदेव गीते, राजु क्षीरसागर, विठ्ठल गीते, वसंत गीते, विठ्ठल गीते, रवी जाधव, रवी गीते, राजू माळी, प्रशांत माळी, मौजूलाल जैन, दिलीप जैन, मिलिंद देव, देवेंद्र देव, किरण बडगुजर, शिवदास राठोड, शिवदास ताराचंद राठोड, बंटी राठोड, अमोल राठोड, योगेश हटकर, धनराज मदने, गुलाम बागवान, खुर्शीद मिस्तरी, अर्जुन मालकर, सुरेश मालकर, सुभाष मालकर, शशिकांत मालकर, विजय काळे, विश्वनाथ उभाळे उपस्थित होते. यावेळी मा. आ. दिलीप वाघ यांनी सर्वांना शुभेच्छा देत भावी वाटचालीस मार्गदर्शन केले. नवनियुक्त चेअरमन शालिग्राम मालकर यांनी सर्वांचे आभार मानले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच. बी. पाटील यांनी कामकाज पाहिले. तर त्यांना संस्थेचे सचिव दिपक बोरसे, कर्मचारी संजय मालकर, दिनेश बडगुजर, अशोक मालकर यांनी सहकार्य केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content