गुजराल पेट्रोल पंपाजवळ चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकास लुटले; एकाला अटक

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालकास तीन जणांनी चाकूचा धाक दाखवून खिशातील दीड हजार रूपयांची रोकड बळजबरी काढून घेवून मारहाण केल्याची घटना रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, निहाल अहमद इपतेखार अहमद शेख (४०, रा.धुळे) या ट्रक चालकास तिघांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण केली व दीड हजार रुपये खिशातून काढून घेतल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजता घडली. याप्रकरणी भिमराव मुकेश पवार (इंद्रप्रस्थ नगर), दुर्गेश आत्माराम सन्यास व आणखी एक अशा तिघांविरुध्द मंगळवारी पहाटे ५ वाजता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भिमराव पवार याला अटक करण्यात आली असून इतर दोघं जण फरार आहेत. निहाल अहमद इपतेखार अहमद शेख हे ट्रक (क्र.एम.एच.१८ बी.जी.८७८९) घेऊन जळगावात आले होते. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण करीत आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!