गुजरातसह आसाममध्ये भूकंपाचे धक्के !

शेअर करा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातच्या राजकोटसह आसामच्या करीमगंज भागात आज भागात भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी गुरुवारी हिमाचल प्रदेशच्या उना येथे भूकंपाचा हादरा बसला होता.

store advt

 

राजकोटमध्ये आज सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. रिक्टर स्केलवर भूकंपची तीव्रता ४.५ इतकी होती. त्यानंतर काही वेळेतच करीमगंजमध्ये ही भूकंपाचे धक्के जाणवले. ७ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के येथे जाणवले. ज्याची तिव्रता ही रिक्टर स्केलवर ४.१ इतकी होती. दरम्यान, गुरुवारी पहाटे हिमाचल प्रदेशातील उना येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशच्या उना येथे पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर २.३ तीव्रतेचा हा भूकंप होता.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!