गिरीश महाजनांनी धुळ्याचे खड्डेपूर केले : शिवसेनेची टीका

धुळे प्रतिनिधी | आमदार गिरीश महाजन यांनी धुळेकरांना विकासाच्या भूलथापा देऊन शहराला सिंगापूर करण्याची मोठी स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात मात्र धुळ्याचे खड्डापूर केला असल्याचा आरोप करत आज शिवसेनेने जोरदार हल्लाबोल केला.

धुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी शहरात कामे होत नसल्याने शिवसेनेने आता जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील खड्डयांच्या मुद्यावरून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने चक्क महापालिकेच्या गेटवरच घटस्थापना करून आंदोलन केले. यामुळे प्रशासनाने शिवसेनेला लेखी आश्‍वासन देऊन खड्डे बुजविण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर धुळे जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी यांनी आज भाजप नेते आ. गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मिस्तरी यांनी म्हटले आहे की, शहरात सध्या विकासकामांचा ठणठणाट आहे. यातच धुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने चार वेळा शास्ती माफ करून १७ ते १८ कोटींची घरपट्टी धुळेकरांकडून वसूल करण्यात आली. मात्र, शहरातील विकास कामं व खड्डे दुरुस्तीसाठी मनपा प्रशासन व भाजपाच्या सत्ताधार्‍यांनी शहरासाठी १८ रुपये देखील खर्च केले नाहीत. सर्व १८ कोटी रुपये भाजप नगरसेवक व त्यांच्या नातलगांच्या ठेकावरील बिल अदा करण्यात आले, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. कागदावरचे घोडे नाचवत धुळेकरांची फसवणुकीचे काम मनपा व सत्ताधारी भाजपाने केले आहे, असा गंभीर आरोप महेश मिस्तरी यांनी केला आहे.

दरम्यान, भाजप नेते गिरीश महाजन यांनी विकासाचे गाजर दाखवत सिंगापूर करण्याचे स्वप्न दाखवून धुळ्याला अक्षरशः खड्डापूर केला असल्याचा आरोप देखील महेश मिस्तरी यांनी केला आहे. दिल्लीच्या भाजप सरकार यांच्या इशार्‍यावर चालणारे धुळ्यातील मनपा प्रशासन हे बगलबच्चे असल्याचा टीका देखील महेश मिस्तरी यांनी केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!