गिरणा पात्रात बुडाला तरुण ; अग्निशमन पथकाद्वारे शोधकार्य सुरु

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गिरणा नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती बुडाली असून त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. मात्र, पथकास बुडालेली व्यक्त अद्यापही सापडलेली नाही.

 

गिरणा पंपिंगच्या खालच्या बाजूला गिरणा नदीमध्ये एक व्यक्ती बुडाला असल्याची माहिती सभागृह नेते ललित कोल्हे यांनी अग्निशमन विभागास भ्रमणध्वनीद्वारे दुपारी ३. ४५ मिनिटानी कळविले. यानंतर अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी यांच्या आदेशाने रेस्क्यू पथक रवाना झाले होते. या रेस्क्यू पथकात वाहन चालक-देविदास सुरवाडे फायरमन-वसंत कोळी,रोहिदास चौधरी, सरदार पाटील यांचा समावेश होता. त्यांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे सदर व्यक्ती सापडलेली नाही. दरम्यान, रोहन मोहन कसोटे (वय २१ रा.म्युन्सिपल कॉलनी रामानंद नगर) असे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रोहन याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेला आहे. कसून शोध घेऊनही तरुण न सापडल्याने सायंकाळी ६ ते ६.३० वाजेदरम्यान रेस्क्यू पथक हे परतले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!