यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सांगवी खुर्द येथील ग्रामपंचायतीने गावातील गावठी दारूची विक्री बंद करण्याचा ठराव संमत केला असून याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील सांगवी खुर्द गावातील राजरोसपणे विक्री होणार्या गावठी दारूची विक्री पोलीसांनी कारवाई करून तात्काळ बंद करावी असा ठराव ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आला असुन , या विषयाची माहिती यावल पोलीसांना सरपंच.ज्योती डिगंबर कोळी यांनी तक्रार निवेदनाद्वारे दिली आहे.
या संदर्भात पोलीस निरिक्षक यांना दिलेल्या तक्रार निवेदनात सांगवी खुर्द गावाच्या सरपंच ज्योती डिगंबर कोळी यांनी म्हटले आहे की , आमच्या सांगवी खुर्द ग्रामपंचायतीच्या गावा हद्दीत गावातील रविन्द्र पोपट कोळी आणी प्रदीप पोपट कोळी हे अवैद्यरित्या रसायन युक्त गावठी हात भट्टीची दारू तयार करून, गावात राजरोसपणे विक्री करीत आहेत.
या खुलेआम मिळणार्या दारूमुळे व्यसनाच्या आहारी गेलेल्या दारूड्यांची अनेकांना त्रास सहन करावा लागत अजुन , सदरची दारू विक्री कायमची बंद व्हावी यासाठी परिसरातील नागरीकांच्या तक्रारी ग्रामपंचायत कडे आल्या. यामुळे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच ज्योती डिगंबर कोळी यांनी ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण सभेत गावात विक्री होणार्या गावठी दारूची विक्री कायमची बंद करण्यात यावी असा ठराव संम्मत केला असुन , या बाबत पोलीस प्रशासनाने तात्काळ योग्य कारवाई करून दारू विक्रीचा धंदा कायमचा बंद करावा असे लिखित तक्रार निवेदनाव्दारे सरपंच ज्योती डिगंबर कोळी यांनी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्याकडे केली आहे.
गावठी दारूच्या आहारी जावुन मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्यांची संख्या वाढली असुन असा वेळी त्यांच्या व्यसनापायी कुटुंबावर प्रसंगी उपासमारीचे प्रसंग ओढवले जात आहे याबाबत गावातील अनेक महीला भगिनी हे आपल्याकडे कुटुंबाची व्यथा मांडतात त्यामुळे एक महिला सरपंच असल्यामुळे माझे याविषयी काळजी घेणे कर्तव्य आहे असे सरपंच ज्योती कोळी यांनी म्हटले आहे .