गारगोटी तस्करी प्रकरणी; आरोपीला ठोठावली चार दिवसांची कोठडी

चाळीसगाव, प्रतिनिधी | गौताळा अभयारण्यात गारगोटी तस्करी करतांना एकाला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव येथील गौताळा अभयारण्यात ९ जानेवारी रोजी तीन इसम हे गारगोटीचे अवैध उत्खनन करत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांना मिळाली. त्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता. जंगलाचा फायदा घेत दोन जण पसार झाले. मात्र तोहिद युसुफ खान (२०) रा. ब्राह्मणी गराडा ता. कन्नड जि. औरंगाबाद याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील १२ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या गारगोटीसह अवजारे जप्त केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. हि कारवाई सहाय्यक वनसंरक्षक आशा चव्हाण, जळगाव जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनपरिक्षेत्राधिकारी ज्ञानेश्वर देसाई, वनपाल पाटणा ललित गवळी, वनपाल बोढरा दीपक जाधव, कन्नड वनपरिक्षेत्रातील पारधी वनपाल यांच्यासोबत वनरक्षक उमेश सोनवणे, अजय महिरे यांच्यासोबतच कन्नड वनपरिक्षेत्रातील वनरक्षक, नानासाहेब सोनवणे तसेच वाहन चालक उमेश शिंदे व बापू आगोणे आदींनी केली. तसेच रोजंदारीवर काम करणारे मजूर राजाराम चव्हाण, नितीन राठोड, गोरख राठोड, नाना पवार, मेघराज चव्हाण, अनिल शितोळे, गणेश राठोड, शुभम राठोड आदींनी महत्वाची भूमिका बजावली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!