जळगाव, प्रतिनिधी । येथील गांधी व फुले मार्केट येथील दुकानांना सील करण्यात आले. यात रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या एका दुकानाचा तर व्यावसाय करणाऱ्या एका दुकानाला महापालिकेतर्फे सील करण्यात आले आहे. पालिकेच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.
गांधी मार्केट मधील गाळे क्रमांक ६ व ७ येथे शिवसागर क्रिएशन हे दुकान लॉकडाऊनच्या काळात कापड विक्री बंद असतांना दुकान सुरु असल्याचे लक्षात आल्याने मनपाच्या पथकाने हे दुकान सील केले आहे. दुकान जगदीश हसमतराय फैलानी यांच्या मालकीचे आहे. तर फुले मार्केट येथे दिलीप नामदेव वालेचा यांच्या मालकीचे दुकान नंबर ३४ वालेचा किराणा स्टोअर्स आहे. ते नेहमीच रस्त्यात अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे दुकानातील सामान बाहेर ठेवत असत त्यास चार ते पाच वेळेस समाज देण्यात आली होती. तसेच २ वेळेस दंड आकारणी करण्यात आली होती. मात्र, दुकानदाराने आज पुन्हा माल दुकानाच्या बाहेर ठेवल्याचे आढळून आल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली. त्या दुकानासमोर चिंचोळा मार्ग असतांना माल दुकानाच्या बाहेर ठेवला होता. येथून लोकांना ये- जा करतांना अडचण होत होती. उपायुक्त वाहुळे हे आपल्या पथकासह पाहणी करत असतांना त्यांना हा प्रकार दिसून आला. उपायुक्त वाहुळे यांनी या वेळी हे दुकान सील करण्याचे आदेश दिलेत. यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुकान सील करण्याची कारवाई केली. यावेळी गोंधळ निर्माण झाला होता. हे दुकान जगदीश हसमतराय फैलानी यांच्या मालकीचे आहे. ही कारवाई अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान, संजय पाटील, विजय देशमुख , संजय ठाकूर, वैभव धर्माधिकारी आदींच्या पथकाने केली.