गांजाची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक; ६० हजाराचा गांजा हस्तगत

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा ते लासुर रोडवर चोपडा शहर पोलिसांनी छापा टाकून ६० हजार रुपये किमतीचा अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दुचाकीधारकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा ते लासुर रोडवरील हॉटेल फौजीजवळ दुचाकीने गांजाची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिक सावळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता धडक कारवाई करत दुचाकी अडविली. यात दुचाकी चालक रमजान जाबाज तडवी (वय-४२) रा. वरगव्हाण ता. चोपडा याची अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेल्या एका पिशवीत ६० हजार रुपये किमतीचे ६ किलो गांजा आढळून आला. याबाबत त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. दरम्यान पोलिसांनी गांजासह दुचाकी हस्तगत केली असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक संतोष पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रमजान जाबाज तडवी (वय-४२) रा. वरगव्हाण ता. चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content