गसची मतमोजणी उद्या

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी नोकरांची सोसायटी निवडणुक मतदानाची मोजणी शनिवार ३० एप्रिल रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी ८ वाजेपासून करण्यात येणार आहे.

राज्यासह जिल्ह्यात प्रथितयश तसेच नावाजलेल्या सर्वात मोठ्या अशा जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सोसायटी निवडणूक मतदान प्रक्रिया दि. २८ एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीत ३२ हजार ४४ सभासदांपैकी २५ हजार ३९० सभासदांनी मतदान केले. यात मतदानाची मतमोजणी प्रक्रिया कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शनिवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासून केले जाणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेसाठी ७९ टेबल लावण्यात आले असून प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी असे एकूण ६५३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. इतर निवडणुकांप्रमाणे इव्हीएमद्वारा मतदान प्रक्रिया ऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मतमोजणी करण्यास सुमारे ८ ते १० तासांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे प्रशासनसूत्राने म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content