रावेर : शालिक महाजन । बोरखेड्याच्या हत्याकांडाच्या घटनेचे गांभीर्य पाहून भिलाला कुटुंबाच्या झोपडीत जिल्हाधिकारी तब्बल तीन तास तर पोलिस अधीक्षक सात तास थांबुन तपासाचे चक्र फिरवत होते.
या पूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षकांसह सर्व पोलिसांनी आणि कार्यवाहीत जिल्हाधिकारी यांनी पूर्ण पारदर्शकता ठेवलेली होती . पत्रकारांसह स्थानिक लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत होती त्यामुळे तणाव वाढला नाही किंवा राजकीय अर्थाने कुणालाच वास्तवाचा विपर्यास करता आला नाही
या कामगिरी बद्दल काल खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. पीडीत परिवाराला घर, शेतजमीन आणि आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या.
उत्तर प्रदेशच्या हाथरसची घटना भारतभर गाजत असतांना बोरखेडा चिमुकल्यांच्या हत्याकांडामुळे महाराष्ट्राभर चर्चेत आले. भिलाला कुटुंब रस्त्याला लागून असलेल्या शेतात छोटयाश्या लाईट नसलेल्या घरात राहतात . मजूरी त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन .
शुक्रवारी सकाळी आठ वाजता रावेर पोलिसांना या हत्याकांडाची माहीती शेतमालकाकडून समजली ही भावंडे आदिवासी असल्याचे कळताच पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे घटनास्थळी पोहचले बाहेरगावी गेलेले मयत भावंडाचे आई-वडील तोपर्यंत घरी पोहचले नव्हते त्या आधी एसपी डॉ मुंढे आलेले होते. भिलाला कुटुंबाचे सात्वंन आणि आरोपीचा शोध घेत सामाजिक व राजकीय स्थिती व्यवस्थित हाताळत होते.
दुसरीकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनाही माहिती कळताच तेदेखील घटनास्थळी दुपारी पोहचले जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे दोघेही भिलाला कुटुंबाच्या झोपडीत कित्येक तास उभे होते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत भिलाला कुटुंबाना महसूल व आदिवासी प्रकल्प विभागा कडून काही मदत देता येईल का. ? यासाठी प्रांतधिकारी अशोक कडलक, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याशी चर्चा करत होते .
एसपी डॉ प्रविण मुंढे याच झोपडीतुन तपासाची चक्र फिरवत डिवायएसपी नरेंद्र पिंगळे , एलसीबीचे बापू रोहम, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे,
सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोज वाघमारे या स्थानिक अधिका-यांना मार्गदर्शन करत होते पोलिसांनी ३ संशयित आरोपी शुक्रवारीच ताब्यात घेतले आणि आरोपींकडून सत्य वदवून घेतले