खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीस अटक

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । खूनाच्या गुन्ह्यात असलेला फरार असलेला १९ वर्षीय संशयित आरोपीस बुधवारी सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक केली. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात भाग-५, गुरनं ८३६/२०२० प्रमाणे संशयित आरोपी आदर्श उर्फ आदु मनोहर गायकवाड (वय-१९) रा. भुसावळ यांच्या विरोधात १४ सप्टेंबर रेाजी हाणामारीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून संशयित आरोपी हा फरार होता. दरम्यान, संशयित आरोपी आदर्श हा भुसावळ शहरात असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली. पथकातील सपोनि अनिल मोरे, मंगेश गोटला, पोना रविंद्र बिऱ्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, उमकांत पाटील, समाधान पाटील, पो.का.विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, योगेश महाजन, कृष्णा देशमुख यांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजता शहरातील पंधरा बंगला येथून संशयित आरोपी आदर्श गायकवाड याला अटक केली आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!