खुशखबर : लवकरच दाखल होणार मान्सून !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृतसेवा | कडाक्याच्या उन्हामुळे लाहीलाही होत असतांना आता मान्सूनच्या आगमनाची वर्दी मिळाली आहे. स्कायमेटतर्फे याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

 

सध्या कडाक्याच्या उन्हामुळे सर्वच जण त्रस्त झालेले आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये ४० अंशापेक्षा जास्त तापमान आहे. खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात तर पारा अजून यापेक्षा मोठ्या प्रमाणात चढलेला असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, स्काकमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी आज दिलासा देणारी माहिती जाहीर केली आहे.

 

शर्मा यांच्या माहितीनुसार,  अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सून येईल, असे संकेत मिळालेत. कोकणात २७ मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. ५ ते ७ जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले आहे. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. पुढील ३-४ दिवसात पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content