खा.महात्मेंच्या प्रयत्नामुळे धनगर समाजाला १९२ घरकुल मंजूर – संदीप सावळे

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हातील धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी खा. विकास महात्मे यांच्या पाठपूराव्यामुळे सुमारे १९२ घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. यासाठी सुमारे सव्वा दोन कोटीची तरतुद करण्यात आली असल्याची माहीती धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे यांनी दिली.

 

धनगर समाजातील गरीब कुटुंब अजूनही घरकुलापासून वंचित आहे. यासाठी रावेर तालुक्यातील धनगर समाजाचे नेते संदीप सावळे यांनी खासदार विकास महात्मे यांच्याकडे पाठपूरावा केला होता. अखेर श्री. सावळेंच्या पाठपूराव्याला यश आले असून जिल्हातील धनगर समाजातील सुमारे १९२ गरीब कुटुंबाना हक्काचा निवारा भेटणार आहे. यासाठी दोन कोटी तिस लाख रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील ८० घरकुले आहे. रावेर तालुक्यातील ३७ घरकुले असून एरंडोल तालुक्यातील ४ घरकुले असून जामनेर तालुक्यातील ७० घरकुलांना मंजूरी मिळाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content