खामगाव बाजार समितीमध्ये शेतकरी आक्रमक ! योग्य हमीभावाची मागणी

 

 

खामगाव : प्रतिनीधी । खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुंगाला ३००० ते ३५०० रूपये दरम्यान भाव देण्यात येत असल्याने शेतकरी आज संतप्त झाले

 

खर्चही निघणार नाही, त्यामुळे योग्य भाव देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले  त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, शहर पोलिस स्टेशन ठाणेदार सुनील आंबुलकर , शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे  सुनील हुड व  पोलिसांचा बंदोबस्त यावेळी होता. यावेळी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आम्हाला योग्य हमीभाव देण्यात यावा ही मागणी लावून धरली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुकुटराव भिसे व इतरांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली पोलिसांच्या उपस्थितीत चर्चा बराच वेळ सुरू होती शेतकऱ्यांना मिळत असलेला भाव  कमी असून सहा ते सात हजारचा भाव देण्यात यावा अशी एकमुखाने मागणी शेतकऱ्यांकडून  होत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.