खळबळजनक : शिरसोली शिवारात दोन भावांकडून विवाहितेवर आळीपाळीने बलात्कार !

शेअर करा !

 

जळगाव (प्रतिनिधी) शेतमालकाने कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून दोन भावांनी विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री शिरसोली शिवारातील मोहाडी रस्त्यावरील ढाके यांच्या शेतात घडली. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कलशा गंगाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला (दोन्ही रा. शिरसोली, ता.जळगाव) असे आरोपींचे नाव आहे. दरम्यान, दोघं आरोपींच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाली आहेत.

store advt

 

 

या संदर्भात अधिक असे की, पीडित महिला व तिचा पती ढाके नामक शेतकऱ्याच्या शेतात राहतात. तर संशयित आरोपी कलशा व बलशा हे दोन्ही भाऊ जवळील राजू बारी यांच्या शेतात कामाला होते. कलशा याला दारु पिण्याची सवय असल्याने शेत मालकाने त्याला कामावरुन काढून टाकले होते. याच गोष्टीचा राग मनात धरुन बलशा व कलशा हे मंगळवारी रात्री पीडित महिलेच्या घरी गेले व कलशा याला कामावरून का काढून टाकले? यावरून पीडितेच्या पतीसोबत वाद घातला. तसेच दोघं पतीपत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. यामुळे भेदरलेल्या पीडितेचा पती मदतीसाठी जवळील शांताराम बारेला यांना बोलवायला गेला. याच दरम्यान, पीडिता देखील पळ प्रयत्न करायला लागली. तेवढ्यात आरोपींनी तिच्या कडेवर असलेल्या लहान मुलीला बाजुला फेकून दिले आणि पीडितेवर बलात्कार केला. दरम्यान, पीडितेवर बलात्कार होत असतानाच तिचा पती आला असता त्यांना पाहून बलशा पळून गेला तर कलशा याला दोघांनी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र हाताला झटका मारुन तो देखील पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी बुधवारी पहाटे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलशा व बलशा यांच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!