वर्धा (वृत्तसंस्था) हिंगणघाट शहरात आज सकाळी एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेत शिक्षिका 20 ते 30 टक्के भाजली आहे.
पिडीत शिक्षिका दररोज सकाळी आपल्या शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. आजही शिक्षिका शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच आरोपीने शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आरोपी हा शिक्षिकेच्या गावातील असल्याचे कळते.