खळबळजनक : लाचखोर पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात १ लाख रूपयांची लाच घेणाऱ्या मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या करवाईमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

याबबात अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात २९ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशिट लवकरात लवकर पाठवून गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जनन्नाथ ढिकले (वय-३२) रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड, मेहुणबारे ता. चाळीसगाव यांनी ४ लाख ५० हजाराची मागणी केली होती. तडजोडी अंती १ लाख रूपये देण्याचे ठरविले होते. दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार खात्री करण्यासाठी लाचलुचपत विभागाने गुरूवार २ जून रोजी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले याने १ लाख रूपयांची रक्कम घेतांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

यांनी केली कारवाई
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोना मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ या पथकाने कारवाई केली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!