खळबळजनक : नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर सामुहिक बलात्कार !

वर्धा (वृत्तसंस्था) नोकरीचे प्रलोभन दाखवून एका १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

store advt

 

पीडित तरुणीला नोकरीचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. शनिवारी दुपारी वर्धा-यवतमाळ महामार्गाजवळच्या परिसरातील देवळीकडे जाणाऱ्या एका फार्म हाऊसवर पिडीत तरुणीला नेण्यात आले. तेथे सहा जणांनी या तरुणीवर बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी सहाही आरोपींना अटक केली आहे.

error: Content is protected !!