मुंबई : धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

शेअर करा !

मुंबई (वृत्तसंस्था) एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 

२९ जुलै रोजी संध्याकाळी तिघे आरोपी ‘कंपनीची कार’ घेऊन फिरायला निघाले होते. त्यांनी १५ वर्षांच्या मुलीला कारमध्ये जबरदस्ती बसवले आणि धावत्या कारमध्येच मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला ईस्टर्न फ्री-वेवर सोडून फरार झाले. यानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांत जाऊत तक्रार केली. फ्री-वेवरील सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडले. या तिन्ही आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत घडलेल्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!