सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सांगली जिल्ह्यातील जत येथील भाजप नगरसेवक विजय लाड यांची अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला करून दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
जतमधील सांगोला रोडवरील अल्फोन्सो स्कूलजवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहे. विजय ताड यांचया समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली जतकडे घटनास्थळी रवाना झाले आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती नुसार, नगरसेवक विजय ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवरील असणाऱ्या स्कूल या ठिकाणी आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलजवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी ताडे यांची गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस अधिकारी याबाबत कसून चौकशी करत आहे.