खर्ची येथील मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील  खर्ची येथे धरणात बैलाला धुण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय बालकाचा मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सकाळी घडली आहे. मयताचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. 

सागर ज्ञानेश्‍वर माळी वय १५ रा. खर्ची ता. एरंडोल असे मयत मुलाचे नाव आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की,  सोमवारी पोळा असल्याने सर्व ग्रामस्थ बैल धुण्यासाठी धरणावर गेले होते. ग्रामस्थांसोबत सागर माळी हा सुध्दा एकदाच घरचे बैल धुण्यासाठी गेला. बैल धुणे झाल्यानंतर सागर धरणात पोहायला लागला. याठिकाणी चिखलात पाय फसल्याने तो बुडाला. प्रकार लक्षात आल्यानंतर याठिकाणच्या इतर ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच खोटेनगरजवळ वाटेतच सागरचा मृत्यू झाला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!