मुंबई प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणारे भाजपचे नेते नितेश राणे आज यांनी पुन्हा त्यांच्यावर शेलक्या भाषेत निशाणा साधला आहे.
ठाकरे सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सहा महिन्यांहून अधिक काळ राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवली. भाजपाने शिवसेनेला आता पुन्हा याच मुद्यावरून टीका केली आहे. भाजप नेते नितेश राणे ट्विट करत शिवसेना पक्षावर हिंदुत्वाच्या मुद्दयावरून टीका केली आहे.
शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं होत. या स्पर्धेत अजान उत्तम प्रकारे म्हणणार्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील, असं सकपाळ यांनी सांगितलं. त्यांचा या भूमिकेनंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. याच मुद्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
नितेश राणे म्हणाले,अहो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की, तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता सेक्युलरआहे. नाहीतर हो मी नामर्द आहे असं तरी सांगा, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे.