खड्डेमय रस्ते दुरुस्त करणार : महापौरांचे आश्वासन (व्हिडिओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवाजीनगर येथील रहिवाश्यांनी सकाळपासून परिसरातील रस्ते दुरुस्तीसाठी रास्तारोको आंदोलन पुकारले होते. आंदोलकांनी मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा  पवित्रा घेतला होता.  आंदोलनस्थळाला महापौर जयश्री महाजन यांनी भेट दिली असता त्यांना खड्डेमय रस्ते दाखविण्यात आले.

 

शिवाजीनगर मधील रहिवाशी  मागील ३ ते ४ वर्षापासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असून त्यांना यासोबत काही मुख्य समस्याही भेडसावत आहे. ह्यात मुख्यत शिवाजीनगर मधील मुख्य स्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न सोडवा,  पुलाचे संथगतीने  होणारे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचे प्रस्तावित काम पुल सुरू होण्याअगोदर पूर्ण करण्यात यावा यांचा समवेश आहे.  दरम्यान, आंदोलन सुरु असतांना महापौर जयश्री महाजन यांनी आंदोलकांची भेट घेतली असता त्यांना महीला आंदोलकांनी घेराव घातला होता. आंदोलकांच्या  मागण्यांना उत्तर देतांना  पुलाचे काम हे महापालिका अंतर्गत येत नसल्याचे महापौरांनी सपष्ट केले. तसेच अमृत व भुयारी गटारींच्या कामामुळे रस्ते खराब झालेले आहेत. यामुळे या रस्त्यास प्राधान्य देवून एक दीड महिन्यात पक्का रस्ता करण्यात येईल तत्पूर्वी  रस्त्यावरील पाणी काढून त्यात कच टाकण्यात येईल असे आश्वासन महापौरांनी आंदोलकांना दिले. दरम्यान, आंदोलकांनी महापौरांना पायी फिरवून खड्डेमय रस्त्यांची दुरावस्था दाखविली.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.