खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे भारताच्या माजी पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून संपन्न करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हेमंत महाजन उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.ताहीरा मीर मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. ताहिरा मीर मॅडम यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य महाजन यांनी ‘ना कोई हिंदू है …या ना कोई मुसलमान है…हम सब भारतीय है..!’असा नारा देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, ग्रंथालय अधीक्षक प्रा. सरोदे,प्रा. डॉ. प्रेमसागर,प्रा डॉ. चव्हाण, प्रा.गवळी,प्रा.कोळी, प्रा. खर्चे मॅडम, तसेच इतर सर्व प्राध्यापकांची विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे, प्रा. डॉ.प्रतिभा ढाके, सहाय्यक राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.दीपक बावस्कर व राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.विजय डांगे यांनी केले. तसेच चेतन रवींद्र मोरे या विद्यार्थ्याची ‘आव्हान 2022’ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संघात निवड झाल्याबद्दल माननीय प्राचार्य व मान्यवरांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल भारंबे, प्रास्ताविक किरण माळी तर आभार प्रदर्शन रोहित जयकर यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

Protected Content