खडसे परिवाराबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाईची मागणी

मुक्ताईनगर, प्रतिनिधी ।  खडसे परिवाराबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याबद्दल सुनिल पाटील नामक व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगरच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,    दि. 17 /9/2021 रोजी सुनिल पाटील याने फेसबुक वर वेगवेगळ्या तीन पोस्ट करून खडसे परिवाराची बदनामी होईल असा मजकुर पोस्ट केला आहे.  यातून खडसे परिवारा बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा बदनामी होत आहे. तरी पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांनी  योग्य चौकशी करून सुनिल पाटील या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल व काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस  तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील  , तालूका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाहिद खान, शहराध्यक्ष राजेंद्र माळी  , विलास धायडे, हरिष ससाणे, रवी सुरवाडे, ललित पाटील, प्रमोद पोहेकर, प्रविण पाटील, अमीन खान,निलेश बोराखडे, संजय कपले, योगेश काळे, संजय कोळी , दिपक साळुंखे,चेतन राजपुत, अजय तळेले यांच्या स्वाक्षरी आहेत

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!