खडसे – देशमुखांची गुप्त बैठक !

जिल्ह्याच्या राजकारणात तर्क वितर्कांना पुन्हा उधाण

शेअर करा !

रावेर : प्रतिनिधी । आज बोरखेडा येथून परत निघताना माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची रावेरात गुप्त बैठक झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात तर्क वितर्कांना पुन्हा उधाण आले आहे .

माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेशाच्या विचारात असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे . आज गृहमंत्री रावेर जवळच्या बोरखेडा येथे जाण्यासाठी जिल्ह्यात आले होते . आजच एकनाथराव खडसे हेही बोरखेडा येथे जात असल्याचे समजल्यावर राजकीय जाणकारांचे कांन टवकारले गेले होते . काहींच्या अंदाजानुसार या भेटीचे भाकीत खरे ठरले . बोरखेडा येथून परत निघताना या दोन्ही नेत्यांनी रावेरच्या विश्रामगृहात अर्धा तास चर्चा केली . ही भेट पूर्वनियोजित नसल्याने कुणालाच याबाबत पूर्वकल्पना नव्हती .

प्रत्यक्ष भेटीतही या दोन्ही नेत्यांशिवाय अन्य कुणी हजर नव्हते त्यामुळे आता या गुप्त चर्चेबद्दल जिल्ह्यात नव्याने चर्चा सुरु झालेली आहे . जिल्ह्यातील राजकारणाचे आडाखे बदलणाऱ्या या हालचालींमुळे सामान्यांचीही उत्सुकता वाढली आहे .

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!