खडसेंना राज्य सरकारने ‘बळीचा बकरा’ केला : बावनकुळे

 मुंबई :। ”झोटिंग समितीच्या अहवालाच सरकारला काही तरी करायचं होतं. खडसेंना राज्य सरकारने बळीचा बकरा केला पुन्हा खडसेंच्या मानगुटीवर बसून त्यांचे नुकसान करायचे होते म्हणून झोटिंग समितीचा अहवाल गायब झाला आणि पुन्हा सापडला,” अशी प्रतिक्रिया माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

 

भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते  एकनाथ खडसे यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. खडसे यांच्या जावयाला ईडीकडून करण्यात आलेली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने न्या. झोटिंग समिती नियुक्त केली होती.
या समितीने आपला गोपनीय अहवालही सरकारकडे सुपूर्द केला होता. मात्र, हा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती समोर आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अहवालाची मागणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. मात्र त्यानंतर हा अहवाल पुन्हा सापडला असल्याचे सांगण्यात आले.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी आज महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.खडसेंच्या मानगुटीवर बसून नुकसान करण्याचा ठाकरे सरकारचा डाव होता असा आरोप भाजपा नेते चंद्रशेखर बानकुळे यांनी केला आहे. खडसेंना राज्य सरकारने बळीचा बकरा केला पुन्हा खडसेंच्या मानगुटीवर बसून त्यांचे नुकसान करायचे होते म्हणून झोटिंग समितीचा अहवाल गायब झाला आणि पुन्हा सापडला असे बावनकुळे म्हणाले.

 

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून २०१६ रोजी न्या. झोटिंग यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीचे कामकाज ३ मे २०१७ पर्यंत चाललं. त्यानंतर ३० जून रोजी समितीने सरकारला गोपनीय अहवाल सादर केला होता.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: