खडके बालगृहात डॉ.सायली महाजन यांचा वाढदिवस साजरा

शेअर करा !

 

एरंडोल, प्रतिनिधी । शहरातील डॉ. सायली महाजन यांनी आपला वाढदिवस खडके येथील अनाथ, निराधार मुलां मुलींच्या संस्थेत साजरा केला. या निमित्ताने महाजन परिवारातील सदस्यांनी मुलांशी संवाद साधला असता ते भारावून गेले.

डॉ. सायली महाजन यांनी याप्रसंगी वाढदिवसानिमीत्त संस्थेस भेट दिल्यामुळे फारच आत्मिक समाधान लाभल्याचे नमूद करत लवकरच नियोजन करुन भेट देण्याविषयी आश्वासन दिले. मुलांना सल्ला व मार्गदर्शन केले आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मुलींनी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे गीत म्हटले. वाढदिवसानिमित्त बालकांना फरसान; सोहनपापडी; पेरू वाटप केले. नंतर सर्व बालकांसोबत मनोरंजन करत नृत्य केले.  वाढदिवसासाठी विजय महाजन, नंदिनी महाजन, मथुराबाई महाजन, पुजा महाजन, वैष्णवी पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थाचालक प्रभाकर पाटील यांनी डॉ. सायली महाजन यांनी वाढदिवस संस्थेत साजरा केल्यामुळे आभार मानले. कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे, प्रमोद पाटील, गणेश पंडीत, ॠषीकेश ठाकरे, तुषार अहिरे; अरूणा पंडीत यांनी परिश्रम घेतले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!