क्षुल्लक कारणावरून मित्रानेच केली मित्राची चाकूने भोसकून हत्या

शेअर करा !

अमरावती (वृत्तसंस्था) क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना अमरावतीत घडली आहे. सुमारास पंकज गोकूळ सिडाम (२८, रा. शोभानगर), असे मृताचे नाव आहे.

store advt

 

धीरज विश्वासराव ठाकरे (२८), सागर गजानन खरड(२२, दोघे रा. शोभानगर), असे आरोपीचे नाव आहे. पूर्वाश्रमीचा खून प्रकरणातील आरोपी धीरज ठाकरे याने पंकजला एका पाणटपरीवर बोलावले. तेथे पंकजशी बाचाबाची झाली. तू फार मोठा झाला का, असे पंकजने आरोपीला म्हटले असता, वाद घालून दोघांनी पंकजला चाकूने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पंकजला अन्य मित्रांनी तातडीने खाजगी रुग्णालयात नेले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!