क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे जळगाव येथील काव्यरत्नवली चौकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन सभा घेण्यात आली .

 

अभिवादन सभेच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले . या सभेत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनसंघर्षावर काही प्रासंगिक उदाहरण देऊन प्रकाश टाकला. त्यानंतर छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र सोनवणे यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सोनवणे यांनी , सूत्रसंचालन बापूराव पानपाटिल तर आभार कानळद्याचे ग्रामपंचायत सदस्य जगदीश सपकाळे यांनी मानले. याप्रसंगी वाल्मिक सपकाळे , फारूक कादरी , बाबुराव वाघ , महेंद्र केदारे , सुरेश तायडे , साहेबराव वानखेडे , सचिन बिऱ्हाडे , पिंटू सपकाळे , विनोद सुर्यवंशी , नामदेव सोनवणे सर , पितांबर अहिरे , दिलीप त्रंबक सपकाळे , युवराज सुरवाडे , गौतम सपकाळे , यशवंत घोडेस्वार , राहुल सपकाळे , आकाश सपकाळे , धनंजय बिऱ्हाडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रमात ” जय ज्योती जय क्रांती , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो ” अशा घोषणा देत अभिवादन करण्यात आले .

Protected Content