कौटुंबिक वादातून पत्नीची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

शेअर करा !

गोंदिया वृत्तसंस्था । घरात पतीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून एका 25 वर्षीय महिलेने 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गोंदियातील रावणवाडी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या चिरामंटोला गावात ही घटना घडली आहे..

गोंदिया तालुक्याच्या चिरमंटोला गावात राहणाऱ्या पदमा उईके या महिलेचं काल रात्री पंकज उईकेसोबत भांडण झालं होतं. पदमाची वडिलांनी तिच्या घरी येऊन तिची समजूत घातली होती. सकाळी घरातील सर्व सदस्य उठल्यावर त्यांनी पदमा आणि मुलगी मुस्कानचा शोध घेतला. मात्र ती घरात तसेच घराबाहेर दिसली नाही.

त्यानंतर घरासमोरील विहिरीजवळ पदमा आणि मुस्कानचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला. याबाबत पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!