कोविड केअर सेंटरमधून महिला रूग्ण बेपत्ता

भुसावळ प्रतिनिधी । येथील नवोदय विद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आलेली वृध्द महिला बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

store advt

जून महिन्याच्या प्रारंभी भुसावळ येथील महिला जिल्हा रूग्णालयातून बेपत्ता झाली होती. यानंतर काही दिवसांनी तिचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला होता. या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमिवर, शहरातल्या नवोदय विद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेली ६५ वर्षे वयाची महिला बेपत्ता झाली आहे. ही महिला साकरी फाटा येथील रहिवासी असून तिचा मुलगा गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्डमध्ये कार्यरत आहे.

error: Content is protected !!