कोरोना विषाणूच्या प्रतिकारासाठी धरणगावकरांच्या एकतेची वज्रमूठ !

धरणगाव प्रतिनिधी । कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारासाठी ग्रामीण रूग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या ७० लाखांच्या मदतीला लोकसहभागातून केलेल्या मदतीची जोड देण्यात आली आहे. यासाठी प्रांताधिकारी विनय गोसावी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी पुढाकार घेतला असून यामुळे शहरासह तालुक्यातील रूग्णांना लाभ होणार असल्याने धरणगावकरांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे.

याबाबत वृत्त असे की, धरणगावच्या ग्रामीण रूग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ७० लाख रूपयांचा निधी प्रदान केला आहे. याच्या जोडीला ग्रामीण रुग्णालयाच्या आधुनिकीकरण व बळकटीकरण साठी काही कामांसाठी अतिरिक्त बाबींची आवश्यकता असल्याने लोकांनी पुढे येऊन यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी तसेच जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्फत करण्यात आले होते. याला धरणगावकरांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

या दात्यांनी केली सरळ हाताने मदत
ना. गुलाबराव पाटील व जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रांताधिकारी गोसावी, तहसीलदार देवरे, न.पा. मुख्याधिकारी जनार्दन पवार, राजेंद्र पाटील, किशोरशेठ शाह, सुनील मालू, खुजेमाशेठ बोहरी आणि मनोज वाणी या दात्यांनी रोख व वस्तूंच्या स्वरूपात भरपूर मदत केली आहे. यामुळे ग्रामीण रूग्णालयात नागरिकांना धरणगावातच अत्याधुनीक उपचार मिळणार आहेत. यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ तसेच नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पुढाकार घेतला असून लोकसहभाच्या या धरणगाव पॅटर्नचे जिल्हाभर कौतुक होत आहे.

यावेळी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,प्रांताधिकारी विनय गोसावी, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन,गटनेते पप्पू भावे,सिव्हील सर्जन एन. एस. चव्हाण, नगराध्यक्ष नायब तहसिलदार प्रथमेश मोहोड,नगरअध्यक्ष निलेश चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र महाजन , नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, सुरेश महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, पी.एम पाटील, धिरेंद्र पुरभे, याच्यासह नगरसेवक व असख्य पदाधिकारी उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.