कोरोना लस डोस कालावधी वाढीवर जयराम रमेश यांना शंका

 

  नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आधी कोरोना लसीचा दुसरा डोस ४ आठवड्यांनी  देत होते  नंतर हा कालावधी ६ ते ८ आठवडे व आता १२ ते १६ आठवडे झाला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा सल्ला  आहे का? मोदी सरकारकडून  पारदर्शी कारभाराची अपेक्षा करावी का? , अशी टीका काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केली आहे

 

सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड  लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला सरकारच्या पॅनेलकडून देण्यात आला आहे. सध्या  हिला डोस घेतल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांनी दुसरा डोस देण्यात य़ेतो. कोवॅक्सिन लसींच्या दोन डोसमधल्या अंतरात काहीही बदल सुचवलेला नाही.

 

ज्यांना करोनाची लागण झालेली आहे आणि लस घेण्याची वाट पाहत आहेत, त्यांना  बरे झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस दिली जावी असा सल्लाही सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी गृप ऑन इम्युनायझेशन या पॅनेलकडून देण्यात आला आहे.

 

गर्भवती महिलांना कोणतीही लस निवडण्याची मुभा असेल.  स्तनपान देणाऱ्या महिला  केव्हाही लस घेऊ शकतात, असंही या पॅनेलकडून सांगण्यात आलेलं आहे. या पॅनेलकडून सुचवण्यात आलेल्या सुधारणा आता राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाकडे पाठवण्यात येईल.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.