कोरोना लसीकरण – समज गैरसमज – कु. पूजा चौधरीचे अमेरिकेतून झूम अँपद्वारे मार्गदर्शन

 

 यावल :  प्रतिनिधी ।  कोरोनाबद्दलची भीती व त्यावर उपचार म्हणून निर्माण केलेल्या लसीबद्दल जे समाजात गैरसमज व भिती निर्माण झाली होती ती  दूर करण्याचा प्रयत्न  अमेरिकेतून  बोलताना कु पूजा चौधरी यांनी केला

कोरोना लसीचे फायदे झूम अँप द्वारे समजवण्यात आले. प्रथमतः फोरमच्या सदस्या सौ. भविका पाटील ( रा. डोंबिवली )  यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना  व सूत्रसंचालन केले.  अंकिता महाजन  यांनी गणेशवंदन करून कार्यक्रमास सुरुवात केली.

फोरमचे अध्यक्ष  हर्षल भंगाळे यांनी  मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त झाल्यानंतर मंडळाच्या सदस्या कु. मानसी चौधरी यांनी   वक्त्या कु. पूजा चौधरी  यांची ओळख करून दिली.

कु. पूजा चौधरी यांच मुळगाव न्हावी ( ता. यावल )  आहे , त्यांनी M. Tech. in Biotechnology (from D. Y. Patil University) केलेले आहे,  त्यांनी University of Arizona, USA येथून M.S. in Cellular and Molecular Medicine पदवी संपादन केलेली आहे. त्या सध्या  Duke Human Vaccine Institute, Durham, North Carilona  येथे संशोधन करत आहेत.

 

कु. पूजा चौधरी यांनी कोरोनाचे दुष्परिणाम तसेच  लसींबाबत योग्य आणि साध्या सरळ भाषेत समजावून सांगितले. ही लस आपल्यासाठी व परिवारासाठी कशी महत्त्वाची आहे हे समजावून सांगितले, महत्त्व व फायदे समजावून झाल्यावर उपस्थित ऑनलाईन श्रोते यांनी त्यांना प्रश्न विचारले त्यावर   कु. पूजा चौधरी यांनी त्यांना  मार्गदर्शन केले.

शेवटी किरण नेमाडे  यांनी आभारप्रदर्शन केले कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाचे संपूर्ण  नियोजन स्नेहल अत्तरदे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी  लेवा युथ फोरमच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न  केले.

Protected Content