कोरोना : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या भीतीमुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली आहे.

store advt

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. या मालिकेतील दूसरा सामना १५ मार्चला लखनऊ आणि तिसरा वन डे सामना १८ मार्चला कोलकाता येथे रंगणार होता. तसेच हे दोन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णयही बीसीसीआयने घेतला होता. मात्र कोरोना व्हायरसचा प्रदूर्भाव पाहता आज मालिकेतील दोन्ही सामने रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे.

error: Content is protected !!