कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी ९४ टक्के यशस्वी झाल्याचा दावा

शेअर करा !

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेतील बायोटेक फर्म इनोव्हिओने कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी ९४ टक्के यशस्वी झाला असल्याचा दावा केला आहे.

store advt

 

इनोव्हिओ कंपनीने आयएनओ-४८०० नावाची लस विकसित केली आहे. या लसीची चाचणी ४० जणांवर केल्यानंतर ती ९४ टक्के यशस्वी झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. क्लिनिकल चाचणी दरम्यान अमेरिकेत १८ ते ५० या वयोगटातील ४० लोकांना चार आठवड्यात दोनदा लशीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर आयएनओ-४८०० लशीमुळे सर्वांच्याच शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या चाचणी दरम्यान, लस टोचल्यामुळे कोणताही प्रतिकूल परिणाम दिसून आला नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, बायोटेक फर्म इनोव्हिओने कोरोना प्रतिबंधक लसीमुळे एक नवीन आशा निर्माण झाली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!