कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात १२९ बाधित रूग्ण आढळले; ५४१ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात  आज जिल्हाभरात १२९  बाधित रूग्ण आढळले आहे तर ५४१  रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. 

 

आजची आकडेवारी

जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-१४, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-३, पाचोरा-४, भडगाव-३ , धरणगाव-०, यावल-३, एरंडोल-३३, जामनेर-९, रावेर-७, पारोळा-८, चाळीसगाव-२२, मुक्ताईनगर-१, बोदवड-३ आणि इतर जिल्हे ३ असे एकुण १२९  बाधित रूग्ण आढळले आहे.

 

जिल्ह्यातील आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४० हजार ७३३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३४ हजार ७६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३ हजार ४१५  रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून २  बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.