कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात ७ कोरोना रूग्ण आढळले; ११ तालुके निरंक

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३३ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-२, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-२, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ४३१ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ५७१ कोरोनामुक्त  झाले आहे. तर २८६ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात ११ तालुके निरंक आढळून आले आहे. 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!