कोरोना उपचार; खाजगी रुग्णालयांसाठी जिल्ह्यात भरारी पथकांची नेमणूक

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । कोरोना उपचारांसाठी राज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना दर आकारणीसह अन्य ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायद्याने नेमलेले सक्षम अधिकारी म्हणून आणि या कायद्याने मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ मे २०२० रोजी खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णावर उपचारांचे किमान दर निश्चित केले आहेत. महात्मा फुले जण आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करून देण्याबबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. खाजगी रुग्नावाहिका आणि परिस्थितीनुसार अन्य वाहने अधिग्रहित करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यासोबतच सरकारी कोषागार खात्याच्या मदतीने तपासणी पथक नेमून खाजगी रुंग्णालयांकडून होणाऱ्या बिल आकारणीचीही तपासणी करण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयांवरील नियंत्रणाचा पुढचा टप्पा म्हणून जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी प्रमुख असलेल्या भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित तलाठी, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या भरारी पथकांचे सदस्य असतील. महापालिका कार्यक्षेत्रात अशी भरारी पथके नेमण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांवर संपवण्यात आली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!