रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात शासनाने शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर नागरीक विविध समारंभ आयोजना संबंधी प्रश्न विचारत आहेत. त्याच्यासाठी सध्या या विषाणुचा प्रादुर्भाव हा स्टेप – २ या स्तरावर आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकत्र गर्दी होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. सुज़ नागरिकाप्रमाणे असे कार्यक्रम कौटुंबिक स्तरावर आयोजित करुन या विषाणुच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरीकांनी समारंभ शक्य असल्यास पुढे ढकलावे. अथवा छोटेखानी कौटुंबिक स्तरावर साजरे करावेत. नागरिकांना अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे.