कोरोनावर औषध बनवलेच नाही ; पतंजलीचा खुलासा !

शेअर करा !

देहरादून (वृत्तसंस्था) उत्तराखंड आय़ुष विभागाच्या नोटिसीला उत्तर देताना पतंजलीने आपण कोरोना बरं करणार कोणतेही औषध बनवले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

store advt

 

बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत कोरोना कीट बाजारात आणले. परंतू कोरोनिल नावाचे औषध पतंजलीने लॉन्च करताच केंद्रीय आय़ुष मंत्रालयाने औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत औषधाच्या चाचण्या सुरू केल्या. उत्तराखंड सरकारच्या आयुष विभागाने तर थेट पतंजलीला नोटीस बजावली होती. तसेच उत्तराखंड आय़ुष विभागाने पतंजलीला परवानगी दिली नसल्याचे सांगितले. नोटिसीला उत्तर देताना पतंजलीने कोरोनावर औषध बनवल्याचा दाव्यावरून कोलांटउडी घेतली आहे. कोरोना बरं करणार कोणतेही औषध बनवले नसल्याचे स्पष्टीकरण पतंजलीने दिले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!