नवी दिल्ली । कोरोनाच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली असून यासाठीची टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच एसओपीचा मसुदा राज्य सरकारांना पाठविण्यात आला आहे.
केंद्र सरकारने राज्यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा ड्राफ्ट पाठविला आहे. यामध्ये लसीकरणाबाबत करावयाची तयारी नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर एका दिवसात १०० लोकांना लस टोचली जाणार आहे. या एसओपीनुसार लसीकरण केंद्रावर एक गार्डसह ५ लोकांची तैनाती केली जाणार आहे. ३ खोल्या वेटिंग, लसीकरण आणि निरिक्षणासाठी उभारल्या जाणार आहेत.
लस टोचून घेणार्या प्रत्येक व्यक्तीला कोणताही दुष्परिणाम दिसून येतो का हे पाहण्यासाठी ३० मिनिटे निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. गंभीर परिस्थिती असल्यास त्याला करार केलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाईल. तर, लसीकरणासाठी खोलीमध्ये एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे. वेटिंग आणि निरिक्षणाच्या खोलीत काही लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाईल.
भारतात तीन कंपन्यांनी लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यामध्ये प्रामुख्याने फायझर, सिरम आणि भारत बायोटेकच्या लसींचा समावेश आहे.