कोरपावली ग्रामपंचायतीत विकासकामांच्या निधीतून अपहार झाल्याची तक्रार

 

 

 यावल  :  प्रतिनिधी  ।  तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीतून  लाखों रूपयांचा अपहार झाल्याची तक्रार  सामाजीक कार्यकर्ते मुनाफ तडवी यांनी गटविकास अधिकारी  यांचेकडे करीत  चौकशी करून  दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

 

मुनाफ तडवी यांनी तक्रार निवेदनात म्हटले आहे की मागील पंचवार्षिक कार्यकाळात शेवटच्या टप्प्यात चौदाव्या वित्त आयोगाचा निधी विकास  आरखड्यानुसार   उपलब्ध झाला असतांना या  निधीतून प्रत्यक्षात काम न करता लाखो रुपयांचा अपहार माजी सरपंच सौ.कोळंबे  व ग्रामसेवक प्रवीण सपकाळे यांनी केल्याचे दिसून येते  या  निवेदनात तडवी वाड्यातील पेव्हर ब्लॉक , स्मशानभूमीचे सुशोभीकरण   ,जि. प.  मराठी व उर्दू शाळेत खेळणी साहित्य पुरविणे, अंगणवाडी साहित्य व दुरूस्ती, शेती अंतर्गत रस्ता दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली बोगस कामे दाखविले, गावहाळ दुरुस्ती सार्वजनिक  शौचालय बांधकाम  यांसारखी बोगस कामें करून व शासनाची दिशाभूल करून लाखो रूपयांचा अपहार झाल्याचे दिसून येते,

 

ग्रामसेवक यांनी  दि २९,  फेब्रुवारी  ते २८  ऑगस्ट  २०२० पर्यंतच्या सर्वसाधारण सभा तहकूब करून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगून त्यावर उपस्थित सदस्य व काही ग्रामस्थांच्या अर्धवटच सह्या घेतल्या  सदस्यांना अंधारात ठेऊन  तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी वरील कामे दाखवून संगनमताने खोटी बिले पास करून हा लाखो रुपयांच्या निधीचा अपहार केला  आहे , यामागे कोणत्या मोठया अधिकाऱ्याचे मार्गदर्शन व आशिर्वाद आहेत याचीही चौकशी झाली पाहीजे

 

अपहार झाल्याच्या चौकशीचे निवेदन मुनाफ जुम्मा तडवी यांनी यावल पंचायत समितीत    दिले  आहे, चौकशी करून दोषींवर ग्रामपंचायत अधिनियम ३९ ( १)  प्रमाणे कारवाई  करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडुन होणाऱ्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागुन आहे

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.