कॉम्प्लेक्समधील दुकानाला भीषण आग

संपुर्ण दुकान जळून खाक; सुमारे १० लाख रूपयांचे नुकसान

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील सु.भा.पाटील कॉम्प्लेक्समधील एका दुकानात रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानास वेढा घातल्याने दुकानातील फर्निचरसह इतर साहित्य जळुन खाक झाली असून सुमारे १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

पाचोरा नगरपालिकेचे अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होवुन आग आटोक्यात आणल्याने बाजूची दुकाने वाचविण्यात यश आले आहे. अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सु. भा. पाटील काॅम्प्लेक्स मध्ये महिलांचे साज शृंगारासाठी साहित्यांचे “दुल्हन एम्पोरियम” नामक दुकान आहे. नेहमी प्रमाणे दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दुकान वाढवुन घरी गेले. दरम्यान रात्री १०:३० वाजेच्या सुमारास दुल्हन एम्पोरियम या दुकानातुन धुर निघत असल्याचे तेथुन जाणारे दिनेश जैन यांनी दुकानाचे चालक पिंकी राहुल जैन यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो पर्यंत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले होते. या आगीत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुल्हन एम्पोरियमचे प्रो. प्रा. पिंकी राहुल जैन यांनी वर्तवला आहे. सुदैवाने या आगीत जिवितहानी झाली नसुन शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content