कॉंग्रेस सेवा फाउंडेशन कोवीड१९ कंट्रोल रूम जिल्हाप्रमुखपदी जलील पटेल , मिनाक्षी जवरे

 

यावल  :  प्रतिनिधी  ।  कॉंग्रेस सेवा फाउंडेशनकडून स्थापन करण्यात आलेल्या   कोवीड१९ कंट्रोल रूमच्या   जिल्हाप्रमुखपदी जलील पटेल व  मिनाक्षी जवरे ययांची निवड करण्यात आली आहे

 

राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले असुन उपचाराच्या नांवाखाली खाजगी वा शासकीय रुग्णालयायात गरीबाची मोठी आर्थिक लुट करण्यात येत असल्याच्या तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे   उपचाराअभावी असंख्य रुग्णांना  जिव गमवावे लागत आहे , या पार्श्वभुमीवर काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या वतीने राज्य पातळीवर कोवीड१९ शी समर्थपणे लढा व उपचारात कुणावरही अन्याय होता कामा नये म्हणुन जिल्हा निहाय कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे

 

या राज्य पातळीवरील   कार्यकारणीत कोरपावली ( ता – यावल ) येथील काँग्रेस कार्यकर्ते जलील पटेल यांची व भुसावळच्या मिनाक्षी जवरे निवड कॉंग्रेस सेवा फाउंडेशनचे प्रदेशअध्यक्ष अॅड सुभाष गोडसे व सुयोग हिवाले (सोशल एक्टीवेटीस महाराष्ट्र ) यांनी केली आहे  जलील पटेल जिल्हा शल्यचिकीत्सक एन .एस . चव्हाण यांची भेट घेवुन त्यांच्यासोबत जिल्ह्यातील  आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले .

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.