के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एफओएसएस सेंटरचे उदघाट्न

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट येथे आयआयटी मुंबई यांच्या संलग्न एफओएसएस फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर (एफओएसएस) सेंटरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

के.सी.ई.कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट येथे सुरु करण्यात आलेल्या एफओएसएस सेंटरमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्याना तसेच प्राध्यापकांना लिनक्स, लॅटेक्स, पीएचपी यासारखे अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध होणार आहे, या सेंटरमध्ये महाविद्यालयाने अद्यावत आवृत्तीचे 120 कॉम्प्युटर असलेली लॅब विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. F O S S सेंटर व IIT मुंबई स्पोकन ट्युटोरिअल चा उपयोग विद्यार्थयांनी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध सॉफ्टवेअर शिक्षण घ्यावे  असे आव्हान महाविद्यालयाचे प्रा. डॉ. के. पी. राणे. यांनी केले आहे या सेंटरद्वारे महाविद्यालया व्यतिरिक्त इतर विद्यार्थी देखील प्रवेश घेऊ शकतात , या सेंटर च्या स्थापनेसाठी प्रा. डॉ. संजय सुगंधी , प्रा. संजय दहाड , प्रा. डॉ. प्रज्ञा विखार यांनी सहकार्य केले. प्रा. अविनाश सुर्यवंशी हे एफओएसएस सेंटरचे मुख्य कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहत आहेत या कार्यक्रमात विभागांचे प्रमुख, प्राध्यापक सहभागी झाले होते. यानिमित्त महाविद्यालयाचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले व त्यांचे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली.

एफओएसएस सेंटर हा प्रकल्प आपल्या देशातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी एफओएसएस साधनांच्या वापरास प्रोत्साहन देते. शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक मालकीच्या सॉफ्टवेअरवरील अवलंबन कमी करण्याचे आमचे लक्ष्य आहे. व्यावसायिक सॉफ्टवेअरला समान एफओएसएस साधनांनी पुनर्स्थित केले आहे हे सुनिश्चित करण्यासाठी विविध क्रियांच्या माध्यमातून एफओएसएस साधनांच्या वापरास प्रोत्साहित करतो.

के.सी.ई.कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव विभागातील एफओएसएस  केंद्र बनणारे पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे ही फार अभिमानाची बाब आहे. आयआयटी बॉम्बेने महाविद्यालयास ई-लर्निंग सेंटर आणि स्पोकन ट्यूटोरियल प्रशिक्षण पाठ्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी क्षेत्रातील ई-शिक्षणास प्रोत्साहित करण्यासाठी मुख्य स्त्रोत मान्यता दिली. हा कार्यक्रम भारत सरकारच्या एनएमईआयसीटी, एमएचआरडी द्वारा प्रायोजित केला होता. व्हिडिओ (आयआयटी बॉम्बेच्या तज्ञांकडून) आणि सायलॅब, पायथन, लॅटेक्स , लिब्रा ऑफिस आणि ॲक्सेसरीजचे तज्ञ व्याख्याने विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आयटी आणि इतर कोअर क्षेत्रातील तज्ञांना प्रशिक्षित करण्यासाठी वापरले जात आहेत. सध्याच्या तांत्रिक जगात चांगली स्पर्धा घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान 8 ऑनलाइन कोर्स पूर्णत्वाची प्रमाणपत्रे घेतली पाहिजेत. आधुनिक जगाशी संबंधित राहण्यासाठी ऑनलाईन कोर्सेस फार महत्वाचे आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!