के. सी. ई. अभियांत्रिकी महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव कार्यक्रम

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  इंजिनीरिंग च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ.जी.एम.मालवतकर, यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय आर. सुगंधी सर उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य प्रा.एस.ओ.दहाड, अकॅडमिक डीन डॉ.प्रज्ञा विखार, विभाग प्रमुख डॉ. संजय आर कुमावत, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

स्वागतोत्सव कार्यक्रमात योगाचे  महत्व, प्रयोगातून विज्ञान, संघ एकजुटीकरण, दुर्ग किल्ले संवर्धन, अँटीरॅगिंग आणि भारतीय राज्यघटना या विविध विषयांवर,वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले, त्यात प्रा.गीतांजली  भंगाळे, प्रा.दिलीप भारंबे, प्रा.पुनीत शर्मा, प्रा.देवदत्त गोखले, आणि डॉ. रेखा पहूजा या मान्यवरांनी आपले मत विद्यर्थ्यान सोबत  मांडले.

विद्यार्थ्यांना जीवनात जगताना लागणारे सर्व गुन संपन्न व्हावे व जीवन सुखकर व्हावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आणि  स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी विविध गोष्टीचा अभ्यास करावा असे मत या मान्यवरांच्या विचारातून प्रकट करण्यात आले.  कार्यक्रमाची सांगता मा. डॉ. डी. जी. हुंडीवाले सर यांच्या व्यख्यानाने करण्यात आली. शालेय जीवनात आजच्या काळात  उपलब्ध सुविधा  आणि त्यांची सांगड कशी घालावी व येणारा काळ हा स्पर्धेचा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण किती टिकतो हे फार महत्वाचे आहे या विषयावर सरानी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ. संजय सुगंधी, प्रा.एस.ओ.दहाड, अकॅडमिक डीन डॉ.प्रज्ञा विखार , डॉ. संजय आर कुमावत तसेच सर्व  विभाग प्रमुख यांची उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयश्री नारखेडे व प्रा.विजय चॊधारी यांनी सांभाळले. तसेच डॉ.एस आर.पाटील, प्रा.हर्षां भंगाळे, प्रा.स्नेहल भंगाळे आणि प्रा.के.बी.पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन यशस्वित पणे केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content