जळगाव प्रतिनिधी । कोऱ्या कागदावर प्रेयसीची स्वाक्षरी घेतली. त्यानंतर केस न करण्यासाठी प्रियकराच्या वडिलांकडे एक लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी शहरातील तथाकथित समाजसेविका रेखा पाटील व वंदना पाटील यांच्यावर रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल इतरही महिला समाजसेविकांमध्ये खळबळ माजली आहे.
पिडीत तरूणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडीता ही कुटूंबासह पिप्राळा परिसरात वास्तव्यास असून ती त्रिमुर्ती महाविद्यालयात बी फार्मसीचे शिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयात वाघनगर परीसरातील विशाल (बदललेले नाव) याच्याशी ओळख होऊन दोघाचे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दरम्यान या दोघमध्ये वादविवाद झाल्याने संपर्क बंद केला. प्रियकर फोन उचलत नव्हता व भेटायलाही येत नव्हता. यामुळे तरुणीने १५ मे रोजी तथाकथित समाजसेविका रेखा पाटील व वंदना पाटील यांच्याकडे जाऊन प्रेमप्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर १६ मे रोजी तरुणी आर एम.एस. कॉलनीत समाजसेविका रेखा पाटील यांच्या घरी गेली असता या दोन्ही महिलांनी तरुणीची एका अर्जावर स्वाक्षरी घेतली. त्यानंतर तिघे जण रामानंद पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज दिला. या ठिकाणी प्रियकर व त्याच्या वडिलांना बोलवून वाद मिटविण्यात आला. त्यानंतर रेखा पाटील यांनी विशाल हा तुझ्याशी लग्न करण्यास नाही म्हणतो, त्याला आम्ही पाहतो, असे तरुणीला सांगून महिलांनी तिला सोबत त्यांच्या घरी नेले.
घरी गेल्यावर ५५ हजार रुपये फी ची मागणी समाजसेविका महिलांनी तरुणीकडे केली. त्यानुसार तरुणीने तिच्या घरी जाऊन वडिलांना विषय सांगितला. वडिलांनी पैसे दिल्यावर १६ मे रोजी तरुणीने ही रक्कम समाजसेविका महिलांच्या स्वाधीन केली. या तरुणीला या महिलांनी २६ मे प्रयत्न थाबवुन घेत कोणाशी काहीही बोलू नको असा दम भरला. या महिलांची नजर चुकवीत तरुणी २६ मे रोजी तिच्या घरी निघून गेली. व वडीलांना सर्व घटना कथन केली.
दरम्यान या तरुणीच्याप्रकरणी विशाल याच्यावर केस दाखल न करण्यासाठी वंदना पाटील व रेखा पाटील यांनी २ लाख ७० हजार रुपयांची मागणी करून त्याच्या वडिलांकडून १ लाख रुपयांची खंडणी घेतली.उर्ववीत १ लाख ७० हजार रुपयांची मागणी या महिला करत होत्या.तरुणीच्या वडिलांनी विशाल याच्या वडिलांची भेट घेतली असता महिलांचे बिंग फुटले. त्यानंतर पीडीत तरूणीने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तथाकथित समाजसेविकांविरूध्दा गुन्हा नोंदविण्यात आला.